
सांडपाण्याच्या विरोधात तक्र्रार केली म्हणून वृद्धाला मारहाण
रत्नागिरी ः विहिरीशेजारी सोडलेल्या स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याच्या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली या रागाने सुधाकर पांडुरंग सावंत, रा. जांभुळफाटा मजगांव यांना संशयित आरोपी प्रितम चव्हाण याने बांबूने मारहाण केल्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. यातील सुधाकर सावंत हे बस स्टॉपजवळ उभे असता आरोपी प्रितम याने त्यांच्या डोक्यावर व पायावर फटके मारून जखमी केले.