मोरवणे धरणाचा धोका टाळण्यासाठी पाण्याचा साठा कमी करण्याचा निर्णय
तिवरे धरणानंतर चिपळुणातील मोरवणे धरणाच्या बाबतीतही धोका निर्माण झाला आहे या धरणालाही काही प्रमाणात गळती आहे या धरणाच्या बाजूला लोकवस्ती असल्याने धोका निर्माण झाला होता ग्रामस्थ स्वतः जातीने गस्त घालत होते त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी धरणाला भेट दिली धरणाचा धोका टाळण्यासाठी पाण्याचा साठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे