दरवाढ केल्याने चिपळूण बस स्थानकातील पे ऍण्ड पार्क बंद करण्याची वेळ

रत्नागिरी ः चिपळूण मध्यवर्ती स्थानकात वाहनांना शिस्त लावण्यासाठी पे ऍण्ड पार्कची काही वर्षापासून सुरू केलेल्या सेवेला दरवाढीचा फटका बसला असून हे पे ऍण्ड पार्क आता बंद करण्यात आले आहे. हे पे ऍण्ड पार्क सुरू केल्यानंतर वाहतुकीला शिस्त आली होती व महामंडळालाही त्यातून उत्पन्न मिळत होते. हे कंत्राट घेणार्‍या संस्था महामंडळाला दरमहा १६ हजार रुपये देत होते पण अचानक महामंडळाने त्यात १० टक्के भाडेवाढ केली. याशिवाय नागरिकांनी पे ऍण्ड पार्कमध्ये गाड्या न पार्क करता अन्य ठिकाणी गाड्या पार्क करण्यास सुरूवात केल्याने नुकसान झाल्याने पे ऍण्ड पार्क बंद करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button