
तिवरे ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही
रत्नागिरी ः तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी शासन घरे बांधून देतील असे आश्वासन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिले असले तरी याबाबत जागा निश्चित होत नसल्याने हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या गावचे सरपंच चव्हाण यांनी शहराजवळच्या भागात पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. मात्र शासनाने अद्यापही याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरम्याने या ग्रामस्थांपैकी १५ जणांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी ३०० स्क्वे. फूटाची शेड उभी करून देण्यात येत आहे.