अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी
रत्नागिरी ः रत्नागिरीजवळील कोतवडे येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सुहास करडे या संशयिताला पोलिसांनी अटक केली. संशयिताने या मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले व न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.