प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांनी तलावात बुडणार्या मुलाचे वाचविले प्राण
रत्नागिरी ः दापोली येथील नारायण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या कृषि विद्यापीठ वनविभागातील एका विद्यार्थ्याला तलावात बुडत असताना जालगांव येथील बांधकाम व्यावसायिक अक्षय पाठक यांनी त्याला वाचविले. अक्षय पाठक हे नेहमीप्रमाणे नारायण तलावात पोहण्यासाठी आले असता कृषी विद्यापीठातील काही विद्यार्थी येथे पोहण्यासाठी आले होते. ते पोहत असता त्यातील एक विद्यार्थी तलावाच्या मधोमध बुडू लागला. ही गोष्ट पाठक यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तलावाबाहेर आणले व त्याचे प्राण वाचविले.