
खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचेसह तिघांना अटक
जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला भगदाड पडल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंत्यांना रेलिंगला बांधून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे नेते व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे सह तिघांना अटक केली खेडकर यांनी अाधि अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला होता त्यांची मुदत नऊ जुलैला संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता परंतु हा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला त्यामुळे पोलिसांनी खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे