
कोकण रेल्वेला इंधनवाढीचा फटका तरीदेखील १०२ कोटींचा नफा
रत्नागिरी ः कोकण रेल्वेला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात इंधन दरवाढीमुळे कोकण रेल्वेच्या खर्चात १७ टक्के वाढ झाली. असे असले तरी कोकण रेल्वे महामंडळाची या वर्षात २८९८ रुपयांची उलाढाल झाली. त्यातून २९३ कोटी नफा मिळाला. व कर वगळून १०२ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. त्याआधीच्या वर्षात यापेक्षाही अधिक नफा मिळाला होता. परंतु इंधन खर्चात वाढ झाल्याने नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या कोकण रेल्वेच्या गाड्या इंधनावर धावत असून इंधनाचे दर वाढल्याने त्याचा फटका रेल्वेच्या नफ्यावर होत आहे. सध्या कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर इंधनावरील खर्च कमी होवू शकणार आहे.