
कोकणात सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस, अनेक भागात झाडे कोसळण्याचे प्रकार
रत्नागिरी ः आज पहाटेपासूनच कोकणासह गोवा आदी भागात सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी परिसरात सकाळपासूनच पावसाने जोर केला असून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाबरोबरच वारेही वेगाने वाहत आहेत. अनेक भागात रस्त्याच्या कडेला जुने वृक्ष आहेत. मुसळधार पाऊस व जोरदार वार्यामुळे हे वृक्ष कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर काही भागात झाडे कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. नाणीज भागात देखील या महामार्गावर रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत होत आहे.