रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे ः खा. सुनिल तटकरे यांची संसदेत मागणी
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात थोर व्यक्तीमत्व होवून गेली. तसेच येथील सुंदर पर्यटन स्थळाबद्दल जगभरातील लोकांना माहिती मिळावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे अशी मागणी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी संसदेत केली. केंद्रीय अर्थसंकल्पावरील भाषण करीत असताना त्यांनी ही मागणी केली. तसेच केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली.