मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह? वाटूळजवळ ओव्हरब्रीजला भेग पडली
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणावर खोदाई करून भर घालून रस्त्याचे काम करण्यात आले. या परिसरात असलेल्या मोठ्या डोंगरांची कटाई करून माती काढण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसाच्या दणक्यात ही माती वाहून जावून रस्त्यावर आल्याने या मार्गावरून वाहतूक करणेही अशक्य झाले होते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ब्रीजचे भराव व रस्ते खचण्याचे प्रकारही घडले आहेत. वाटूळ येथील बांधण्यात आलेल्या ओव्हर ब्रीजला देखील आता भेग पडली आहे. या परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या काही महामार्गाच्या रस्त्याला भेगा पडण्याचे प्रकार घडल्याने एकूणच मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.