दापोली-आडे परिसरातील २४ गावात वारंवार वीज पुरवठा खंडीत, ८ दिवसात प्रश्‍न सुटला नाही तर आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी ः दापोली -आडे परिसरात २४ गावात गेल्या दीड महिन्यापासून वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असून त्यामुळे पिण्याचे पाणी, मुलांचा अभ्यास व अन्य व्यवसावर मोठा परिणाम झाला असून याबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये असा इशारा माजी सभापती किशोर देसाई व परिसरातील ग्रामस्थांनी वीज मंडळावर मोर्चा नेवून दिला आहे. महावितरणला ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button