
गणेशगुळे परिसरात बिबट्याच्या दोन तरुणांवर हल्ला
दुचाकीवरून व्यायामशाळेत निघालेल्या दोघा तरुणांवर झाडात लपलेल्या बिबट्याने हल्ला केला या बिबट्याच्या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मावळंगे जाधववाडीत राहणारे योगेश जाधव व विक्रांत जाधव हे दोघे तरुण व्यायामशाळेत जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता वाटेत झाडीत लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना खाली पाडले बिबट्याने दोघा तरुणांच्या अंगावर पंजे मारले त्यात ते जखमी झाले त्यांनी आरडाओरड करून मोठ्या शिताफीने आपली सुटका करून घेतली या परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वन विभागाकडे केल्या होत्या याआधीही बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला करण्याचा प्रकार घडला होता.
www.konkantoday.com