
खेडच्या नगराध्यक्षांना अटक करण्याची बहुजन समाज पार्टीची मागणी
खेड येथील जगबुडी पुलाजवळील खचलेल्या रस्ता प्रकरणी कार्यकारी अभियंता श्री बामणे व उपअभियंता श्री गायकवाड यांना पुलाला बांधून आंदोलन करणाऱ्या खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना तात्काळ अटक करा अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी केली आहे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे दरम्यान या प्रकरणात वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे