
दापोली तालुक्यातील तीन गळक्या शाळांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांच्या स्वागताला पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कोणतीही शाळा बंद नसून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक स्वागत केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी दिल. मात्र पहिल्याच दिवशी तालुक्यात तीन गळक्या शाळा आढळून आल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांची वेगळी बैठक व्यवस्था करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली.तालुक्यातील तीन गळक्या शाळांमध्ये दापोली शहरातील काळकाई कोंड, शिवबंदर आणि पालगड येथील पालगड क्र. १ चा समावेश आहे.शहरातील काळकाई कोंड येथील शाळेला मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पहिली ते सातवीपर्यंत तब्बल ६० विद्यार्थी शिक्षण घेतात, पहिल्या दिवशी त्यांची बुरूड समाजमंदिरात तसेच लगतच्या एका शासकीय खोलीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पालगड क्र. १ शाळेचे दुरूस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप पालकांनी केला असून विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यास आक्षेप घेतला.www.konkantoday.com