एसटी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एसटीचे गस्ती पथक
रत्नागिरी शहरात शहर वाहतूक करणारी बस कलंडून पंचवीस विद्यार्थी जखमी होण्याचा प्रकार घडला होता त्यानंतर एसटी विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे चालक व वाहकांना अनेक वेळा सुरक्षित वाहतूक करण्याच्या सूचना करूनही ते सूचना पाळत नाहीत त्यामुळे अपघाताचे प्रकार घडतात या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने आजपासून गस्ती पथक तयार केले असून हे पथक एसटीची वाहतूक सुरक्षित कशी होईल हे पाहणार आहे.