
धरणांची तपासणी करून ४८ तासात अहवाल सादर करा ः जलसंधारण विभागांना आदेश
रत्नागिरी ः तिवरे धरण फुटल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व छोट्या, मोठ्या धरणांची तपासणी करून दुरूस्तीचे प्रस्ताव दोन दिवसात सादर करा असे आदेश जलसंपदा, जलसंधारण विभागाला देण्यात आले आहेत. या दोन विभागांच्या अधिकार्यांसह महसुलच्या उपविभागीय अधिकार्यांनी सर्व धरणांची पाहणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.