
खेम धरणालाही धोका ः जि.प. प्रशासनाची कबुली
रत्नागिरी ः दापोलीतील खेम धरण हे काही प्रमाणात धोकादायक असल्याची कबुली जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. या धरणात गेली काही वर्षे मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. याबाबत वृत्तपत्रातून देखील आवाज उठविण्यात आला होता. या धरणाची देखभाल करण्यासाठी जि.प.कडे तज्ञ कर्मचारी नसल्याने हे काम जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे कळते.