
नितेश राणे यांच्या कृत्याला पाठिंबा नाही, नारायणराव राणे
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांविरोधात स्वाभिमान पक्षाने उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधून चिखलफेक केली या कृत्याचे आपण समर्थन करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. नितेश यांचे वर्तन चुकीचे होते. मुंबई-गोवा महामार्गावर असलेला चिखल व खड्याच्या विरोधात राग आणि आंदोलन समजू शकतो परंतु त्यांच्या समर्थकांनी केलेली हिंसा चुकीची आहे. आपण त्याला अजिबात पाठिंबा देत नाही अशा शब्दात राणे यांनी या प्रकाराचा निषेध केला.
दरम्याने स्वाभिमानच्या दोन कार्यकर्त्यांना या प्रकाराबाबत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.