
जाब विचारायला गेलेल्या भावाला कोयतीने मारहाण
शिवीगाळ करणाऱ्या भावाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या संदीप गुरव यांच्यावर तेच्या चुलतभावाने कोयतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लांजा वनगुळे येथे घडला यातील फिर्यादी संदीप गुरव यांना हरिश्चंद्र गुरव याने शिवीगाळ केली त्याच्या त्याने जाब विचारला असता हरिश्चंद्राने कमरेला लावलेल्या कोयतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला संदीप याने वार चुकवल्याने तो किरकोळ जखमी झाला.