स्वच्छता अभियानाच्या बक्षिसाचे पैसे मिळाले नाहीत, सावंतवाडीच्या नगराध्यक्षांचे धरणे आंदोलन
सिंधुदुर्ग ः स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपालिकेला ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर झाले होते. राज्यातील ज्या पालिकांनी या अभियानात उत्कृष्ट काम केले त्यांना हे बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात सावंतवाडीची नगरपालिका बक्षिसपात्र ठरली होती. मात्र अद्यापही हे ५ कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले नसल्याने नगराध्यक्ष बबन साळगांवकर हे आपल्या सहकार्यानी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.