
पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पाटील याने आजाराला कंटाळल्याने केली आत्महत्या
रत्नागिरी ः पोफळी वीज निर्मिती केंद्राच्या बंदोबस्तासाठी असलेला पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पाटील याने आत्महत्या केली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असण्याची शक्यता पुढे आली आहे. पाटील हा मणक्याच्या आजाराने अनेक दिवस आजारी होता. त्यासाठी तो वर्षभर रजेवरही होता. सोमवारी त्याने ड्युटीवर हजर झाल्यानंतर अचानकपणे आपल्या स्वतःच्या बंदुकीतून हनुवटी व छातीवर दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.