
जिल्हाधिकारी यांचा बोगस डॉक्टरना इशारा
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांचे सर्वेक्षण करून बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत दिले. जिल्ह्यात वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांनी आपल्या दवाखान्याच्या नामफलकावर आपली पदवी नमूद करावी व सदर बाबींची खात्री समितीने करावी, असे आदेश त्यांनी दिले.