
ग्रामपंचायतींना घर बांधणीचे अधिकार प्राप्त व्हावेत यासाठी कोकणातील सर्वपक्षीय आमदारांनी एकजूट दाखविली
रत्नागिरी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घर बांधण्याकरिता परवानगी देण्याचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतींना देण्यात यावेत या मागणीसाठी कोकणातील सर्व पक्षीय आमदारांनी एकजूट करून विधानसभेत आक्रमक पवित्रा घेवून सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे आता २००० स्क्वे. फुटापर्यंतचे घर बांधण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला मिळणार आहेत. विकास कामासाठी सर्वपक्षीय आमदार एकत्र आल्याने या प्रश्नाला वाचा फुटली. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या दालनात बैठक बोलावून याबाबत चर्चा करून दोन्ही जिल्ह्यात २००० चौ. फुटांपर्यंतचे घर बांधण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्याबाबत मान्यता देण्यात आली. विधानसभेत या प्रश्नाला आमदार राजन साळवी यांनी सुरूवात केल्यानंतर त्याला आमदार भास्कर जाधव, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, सदानंद चव्हाण यांचेसह १० ते १५ आमदारांनी विधानभवनात आक्रमक मागणी केली होती. ना. रामदास कदम यांनी या कामी पुढाकार घेतला.