
कोकणातील आंबा बागायतदारांचे न्याय्य हक्कांसाठी उपोषण!
30 जुलै , सकाळी 10 ते 5 ,रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आंबा बागा दारांच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे
महाराष्ट्र सर्वत्र शेतकऱ्यांनामदत केली जाते शासनाकडून कोकणात मात्र
शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. यांचे मुख्य कारण कोकणातील शेतकरी संघटित नाही. कोकणातील शेतकरी एकत्र येऊन आपल्या समस्यांवर आवाज उठवीत नाहीत . आणि म्हणूनच कोकणातील शेती प्रश्नांवर शासकीय उदासीनता दिसून येते.
कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही, विजेची चोरी करत नाही, कर्जमाफी, व्याज माफी, विज बिल माफ अशा मागण्या करत नाही ही एका अर्थाने स्वागतार्ह बाब आहे. म्हणूनच शासनाने कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि न्याय दिला पाहिजे.
गेली आठ दहा वर्ष कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत आहे अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत परिस्थिती गंभीर होण्या अगोदर या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. याकरिता एक संघटीत अभियान व संघटन समृद्ध कोकण संघटनेने करायचे ठरवले आहे.
कोकणातील आंबा बागायतदारांचा विमा उतरवताना अनेक अडचणी आहेत ह्या प्राधान्याने सोडवल्या पाहिजेत
कोकण हापुसचा ब्रांड विकसित करुन , देशात दलाल शिवाय थेट आंबा विक्री व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
पुढील वर्षी मुंबई पुणे आणि राज्यातील प्रमुख शहरात शंभर ठिकाणी दोन महिन्याकरता एप्रिल-मे महाराष्ट्र शासनाने आंबा बाजार आयोजित करावे कोकणातील हापूसचा ब्रँड विकसित करावा कोकणातील हापूस खात्रीने मिळण्याच्या व्यवस्था निर्माण कराव्यात व या आंबा बाजारात कोकणातील हापूस उत्पादकांना शेतकऱ्यांना त्यंच्या गटांना विनामूल्य स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत अशी आग्रही मागणी आम्ही करीत आहोत. याशिवाय विमानतळ बस डेपो राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून थेट आंबा विक्री व्यवस्था निर्माण करावी.
2014 साली आंबा बागायतदारांना व्याजमाफी सरकारने दिली होती ती अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. ही व्याजमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे
यावर्षी विशेषता रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे उत्पन्न दर वर्षीच्या 30 ते 40 टक्के आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आंबा बागेला फवारणी, खते, मजुरी असा खर्च झाला तोही शेतकऱ्यांना मिळू शकला नाही किंबहुना शेतकरी प्रचंड तोट्यात आहेत म्हणून राज्यात इतर भागात दिली जाते तशीच कर्जमाफी विशेष बाब म्हणून कोकणातील आंबा बागायतदारांना यावर्षी देण्यात यावी व याकरता विशेष पॅकेज महाराष्ट्र शासनाने द्यावे.
कोकणातील मुख्य पिके आंबा-काजू याकरता मागील सरकारने आंबा-काजू बोर्ड स्थापन केले , मात्र या बोर्डाला निधी दिला नाही आणि ते कधीच चालू झाले नाही या बोर्डाला दरवर्षी 500 कोटी निधी अर्थसंकल्पात तरतूद करून कोकणातील बागायतदारांच्या विकासाच्या, आणि मार्केटिंग सुविधा
या व अशा अनेक मागण्या न करता एक दिवशीय उपोषणाचा कार्यक्रम पावस पंचक्रोशी आंबा उत्पादक संघ, कोकण हापूस आंबा उत्पादक संघ रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी हापूस आंबा उत्पादक संघ व समृद्ध कोकण संघटना यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 30 जुलै रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा उपोषणाचा कार्यक्रम सका 10 ते 5 आयोजित केला आहे.कोकणातील शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी जास्तीत जास्त कोकणवासियांनी, मान्यवरांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा सहभागी व्हावे.
www.konkantoday.com