
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
लांजा नांदिवली येथील अनंत सनगळे हा तरुण मासे पकडण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मरण पावला. अनंत हा बौद्धवाडी येथील ओढय़ावर असलेल्या बंधार्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता परंतु सायंकाळ झाली तरी तो घरी परतला नाही तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी अनंत हा ओढय़ात मृतावस्थेत सापडला.