प्लास्टीकविरोधी मोहीम कडक करणार
मुंबई ः मध्यंतरी प्लॅस्टीकविरोधात थंडावलेली कारवाई आता परत एकदा जोरात सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. सरकारने प्लॅस्टीक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवस कारवाईच्या भीतीने प्लॅस्टीकचा वापर बंद झाला होता. मात्र आता त्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
प्लॅस्टीकचे दुष्परिणाम मोठे असून त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापार्यांनी दुसर्या व्यवसायाकडे वळावे असाही सल्ला कदम यांनी दिला आहे. महाराष्ट्रात ८० टक्के प्लॅस्टीक गुजरातमधून येत असून गुजरातमध्येही प्लॅस्टीकबंदी लागू करावी असे आपण पंतप्रधानांना पत्र लिहून कळविले असल्याचे कदम यांनी सांगितले.