
प्रतापगडावर रोपवे होणार
रत्नागिरी ः किल्ले प्रतापगडावर पर्यटकांच्या सुविधेसाठी जावळी ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरणांतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुर्ततेनंतर पर्यटकांना प्रतापगडावर जाणे सोयीचे होणार आहे. हा रोपवे ५.७ कि.मी. असा राहणार आहे.