गणपतीपुळ्याच्या विकासासाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी समितीकडे सुपूर्द
रत्नागिरी ः गणपतीपुळ्याच्या विकास आराखड्यातील कामांकरिता १०२ कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यामध्ये गणपतीपुळ्याकडे जाणारे रस्ते, प्रवेशद्वार, घनकचरा, सांडपाणी, पार्किंग, सुशोभिकरण, चेंजिंग रुम, टॉयलेट, पाणी पुरवठा, बैठक व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. हा आराखडा मंजूर करण्यात आल्यानंतर ४० कोटी रु. कामाची अंदाजपत्रके तयार करण्यात आली होती त्यापैकी १५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनकडे देण्यात आला आहे. एकूण १०२ कोटी रुपयांचा हा आराखडा असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने हा निधी देण्यात येणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.