खेड पूल प्रकरणात दोषींवर कारवाई परंतु जनतेने कायदा हातात घेऊ नये
खेड येथील जगबुडी वरील नवीन पुलाच्या कामात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे .कोणताही अधिकारी चुकला असेल तर त्याला कायद्याने आवश्यक ती शिक्षा होईल मात्र जनतेने कायदा हातात घेणे योग्य नाही अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा सुनील चव्हाण यांनी दिला आहे. खेड येथील पूल प्रकरणात मनसेने अधिकाऱ्यांना पुलाला बांधून ठेवून रस्ता रोको केले होते.