
शेखर निकम यांनी अनेकवेळा बोलून दाखविल्याने चिपळूण मतदार संघातून उमेदवारीसाठी अर्ज भरल्याचा भास्करराव जाधव यांचा दावा
चिपळूण ः चिपळूण मतदारसंघातून गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला असून त्यामुळे या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्यात खळबळ उडाली आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम हे इच्छूक आहेत. यामुळे जाधव यांनी अर्ज भरल्यामुळे त्यांनी निकम यांना आव्हान दिले असल्याचे बोलले जात होते मात्र जाधव यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना खुलासा केला आहे की, शेखर निकम यांनी अनेकवेळा भास्करराव जाधव हे उमेदवार असतील तर आमचा एक आमदार वाढेल असे अनेकवेळा बोलून दाखविले होते. त्यामुळे त्या विश्वासावरच आपण पक्षाकडे अर्ज केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूण मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला असलेले ५७ हजाराचे मताधिक्य तोडणे आपल्याला अवघड नाही. कारण आपण या मतदार संघात घराघरात फिरलो आहे. एकूणच सध्या तरी या मतदारसंघात नेमका उमेदवार कोण याविषयी उत्सुकता राहणार आहे.