दाभोळ खाडीतील मासे मृत प्रकरणी आ. भास्करराव जाधव यांनी उठवला विधानसभेत आवाज
लोटे एमआयडीसीमधून सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित सांडपाण्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून दाभोळ खाडीमध्ये प्रचंड प्रमाणात मासे मृत झाले आहेत. त्यामुळे खाडीकिनारी मासेमारी करून उदरनिर्वाह करणारा भोई समाज संकटात सापडला आहे. याप्रकरणी सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी आणि मच्छिमारांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्द्याद्वारे केली.