तंबाखूविरोधी मोहीम तीव्र होणार, टपरी चालकांवर धडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
रत्नागिरी ः तंबाखूमुळे मोठे आजार होत असून या तंबाखुची व तंबाखुजन्य विक्री करणार्या टपरी चालकांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कामाच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. अनिल बोल्डे, ऍडिशनल सिव्हील सर्जन डॉ. संघमित्रा फुले, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. शैलेश गवंडे उपस्थित होते. तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणार्यांवर गेल्या आठ महिन्यात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३३ हजाराहून अधिक रक्कमेचा दंड वसुल करण्यात आला आहे.