
सोशल मिडियावरील मैत्रीचा मोह, चिपळूणची अल्पवयीन मुलगी बेंगलोरला सुरक्षित सापडली
रत्नागिरी ः अल्पवयीन मुलं-मुली मोबाईलचा सर्रास वापर करीत असून सोशल मिडियावर मैत्रीचे आमिष दाखवून अशा मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. चिपळूण शहरातील मुरादपूर भागातील एक अल्पवयीन मुलीचे सोशल मिडियावर बेंगलोरच्या एका मुलाशी ओळख झाली आणि त्यातून सोशल मिडियावर मैत्री झाली. बेंगलोरला असणार्या मुलाने तिला बेंगलोरला येण्याचे सांगितल्यावर ही मुलगी घरातून बाजारात जाते म्हणून सांगून बाहेर पडली ती थेट बेंगलोरला गेली. आई-वडिलांनी शोध सुरू केला. मुलीचा फेसबुकचे अकौंटवर ही मुलगी बेंगलोरला गेल्याचे निष्पन्न झाले. दरम्याने त्या मुलाचाही पत्ता फेसबुकवर सापडल्याने आईवडिलांनी बेंगलोरला धाव घेतली आणि या मुलीला सुरक्षितरित्या घरात आणले.
सोशल मिडियाचे लोण आता शहराबरोबरच ग्रामीण भागात पसरल्याने पालकांनी आपल्या पाल्याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे.




