सौ.मंजिरी पडळकर (शिर्के) यांनी कुवारबाव सरपंच पदाचा पदभार स्वीकारला
रत्नागिरी दि. २९ बहुचर्चित कुवारबाव ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या कुवारबाव विकास आघाडीच्या पॅनलने आज सत्ता ग्रहण केले. थेट निवडून आलेल्या सरपंच सौ.मंजिरी पडळकर (शिर्के) यांनी कुवारबाव वासियांच्या उपस्थितीत आपल्या सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी भाजपचे सरचिटणीस व रत्नागिरी एकजुकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री.सतीश शेवडे,कुमार शेट्ये, आघाडीचे प्रवर्तक सतेज नलावडे,सुधाकर सुर्वे ,उपसरपंच सचिन कोतवडेकर,माजी सरपंच केदार,दत्ता मयेकर सदस्य सौ. सुनीला नलावडे ,अनुश्री आपटे, नेहा अपकरे, रमेश चिकोडीकर,गणेश मांडवकर,नरेश विलणकर ,गौरव पावसकर आदी. उपस्थित होते.
आज सरपंच उपसरपंच यांनी कार्यभार स्वीकारल्या नंतर कुवारबाव विकास कामांची कुवारबाव वासियांना ग्वाही दिली. मंजिरी पडळकर यांनी गावविकास आघाडीच्या माध्यमातून जेष्ठ व तज्ञ् व अनुभवी जेष्ठांच्या मार्गदर्शनाने रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे स्पष्ट केले. व कुवारबाव वासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. विकास काम करताना सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी आघाडीचे धनंजय जोशी ,गोपीचंद पाटोळे ,राजन आयरे, मारुती आंब्रे,सुधाकर देसाई ,सुधाकर देवस्थळी,शुभांगी भावे, सुजित झीमण, श्रीमती मलुष्टे ,शेट्ये ,ऍड.सौ.शिवलकर,निलेश लाड,सी. ए. पडळकर, राजा पडळकर,खामकर यांच्या सह अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.