
पावती घोटाळ्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका दोन लाखानी उत्पन्न घटलकाही दिवसांपूर्वी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोलनाक्यावर वसूल केल्या जाणाऱ्या पावत्यांच्या रकमेत खाडाखोड करून मोठ्या प्रमाणावर रकमेचा अपहार झाला होता त्याचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे या प्रकारामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दोन लाखांनी घटले आहे या पावती घोटाळ्याप्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे आता जिल्ह्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठ नाक्यांची भरारी पथकातर्फे तपासणी केली जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय ढवळे यांनी दिली आहे