
चिपळूण मतदारसंघातून भास्कर जाधव यांचे शेखर निकम यांना आव्हान ?
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण संगमेश्वर मतदार संघातून राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे या मतदार संघातून राष्ट्रवादीचे शेखर निकम हे इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी गेली दोन तीन वर्षे मोर्चे बांधणीही केली आहे त्यामुळे या मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी या मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते आता तर त्यांनी पक्षाकडे या मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला आहे यामुळे जाधव यांनी एक प्रकारे शेखर निकम यांनाच आव्हान दिले आहे याशिवाय व घर मतदारसंघातून भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे या अाधी भास्कर जाधव यांनी आपण व विक्रांत हे दोघेही विधानसभेत जाणार असल्याचे एका मुलाखतीत स्पष्ट केले होते आता तर त्यांनी पक्षाकडे तसे अर्ज केले आहेत राष्ट्रवादी पक्षाने राज्यातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागितले आहेत अर्ज आल्यानंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत याबाबत निकम यांनी सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात माप टाकणार हे काही दिवसांनी स्पष्ट होईल परंतु सध्या तरी यामुळे राष्ट्रवादीतील मतभेद उघड झाले आहेत.