पत्नीबरोबर झालेल्या भांडणातून चिडलेल्या तरूणाने चाकूचे वार करून घेवून केली आत्महत्या
रत्नागिरी ः मुरूगवाडा येथील राहणारा दिनेश यशवंत लाखण (३६) हा मुरूगवाडा येथे भाड्याने रहात होता. त्याचे त्याच्या पत्नीबरोबर नेहमी भांडण होत असे. काल असेच भांडण झाल्याने पत्नीला त्याने मारहाण केली. त्यामुळे पत्नी शेजारी निघून गेली. याचा राग डोक्यात धरून दिनेश याने स्वतःच्या पोटात तीन ठिकाणी चाकूचे वार करून घेवून आत्महत्या केली.