
घरमालकाची लाखो रुपयांची रोकड घेवून फरारी झालेल्या मोलकरणीला हिमाचलप्रदेशमध्ये अटक
चिपळूण ः चिपळूण खेर्डी येथील शिल्पा शिवाजी देसाई या घरमालकाकडे आरती सहान (रा. बिहार) ही मोलकरणी म्हणून कामाला होती. मे महिन्यात घरातील चार लाख रुपयांची रोकड घेवून फरारी झाली होती. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. फरारी आरोपींच्या मागे पोलिसांचे एक पथक होते. सदरची महिला हिमाचल प्रदेश येथे असल्याचे पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी तेथे जावून तिला शिताफीने अटक केले.