
आंबेनळी घाटात कोसळलेल्या ट्रकमधील ड्रायव्हर व क्लिनर बचावले, ट्रकचे नुकसान
रत्नागिरी ः पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणार्या आंबेनळी घाटात ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक २०० फूट खाली दरीत कोसळला. हा ट्रक सातारा येथून महाडच्या दिशेने साखरेची पोती घेवून निघाला होता. चिरेखिंड गावाजवळ ट्रकचालकाचा अंदाज चुकल्याने ट्रक खाली दरीत कोसळला. ट्रक चालक अमर पिसाळ हा व त्याच्याबरोबरचा क्लिनर मात्र या अपघातातून बचावले. या झालेल्या अपघातात साखरेची पोती पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.