
साखरपा आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळणार
रत्नागिरी ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या साखरपा आरोग्य केंद्राला आता ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. या महामार्गावर होणार्या अपघाताच्यावेळी अपघातग्रस्तांना या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे या आरोग्यकेंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी आ. राजन साळवी यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली होती त्याला त्यांनी मान्यता दिली आहे