
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
रत्नागिरी ः राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नव्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून रत्नागिरी विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी सज्जन लाड (गणेशगुळे), सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्षपदी संतोष सावंत (नाचणे), रत्नागिरी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख श्रीकांत देसाई (जाकादेवी), कल्पेश महाकाळ (वाटद), भागेश मयेकर (मालगुंड), समीर भाटकर (चांदेराई), अनंत पाले (हातखंबा), देवेंद्र पाटील (पावस), सुनिल वारेकर (कोतवडे), कल्पेश सुवारे (खानू) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालय प्रमुख म्हणून सिद्धेश शिवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.