
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील मोठा जुना वृक्ष कोसळला
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेला भला मोठा जुना वृक्ष मुळापासून उन्मळून खाली कोसळला. सुदैवाने हे झाड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर कोसळले. सुदैवाने आज कार्यालयीन कामकाजाचा दिवस असूनही त्यावेळी त्या भागात कोणी नसल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हे झाड बाजूला करण्याचे काम तत्परतेने सुरू करण्यात आले.