नगराध्यक्षांची निवडणुक लादून शिवसेना जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतेय ः राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांचा आरोप
रत्नागिरी ः सुशिक्षित नगराध्यक्षाची प्रतिमा पुढे करून पाच वर्षे निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाला राजीनामा देण्यास लावून परत एकदा निवडणूक लादून शिवसेना शहरातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी केला आहे.
नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीचा येणारा खर्च सत्ताधारी शिवसेनेकडून वसुल करावा अशीही मागणी त्यांनी केली. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे बंड्या साळवी हे उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याने ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास सध्या असलेले त्यांचे नगरसेवक पद सोडावे लागेल व त्या ठिकाणी देखील पोटनिवडणूक घ्यावी लागेल यासाठी त्यांनी आताच आपल्या नगरसेवक पदाचाही राजीनामा द्यावा व या दोन्ही निवडणुका एकत्र घ्याव्यात अशी मागणी मयेकर यांनी केली आहे.