
शरीर सुखासाठी सुनेकडे तगादा लावल्याने सुनेने आत्महत्या केल्यानंतर सासर्याची आत्महत्या
आपल्या सुनेकडे शरीर सुखाची मागणी करून तिला टॉर्चर केल्याने त्रासाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली त्यानंतर त्रास देणारा सासरा हरेश पवार यानेही विष घेऊन आत्महत्या केली हा प्रकार खेड नारंगी नदीच्या बाजूला असलेल्या वीटभट्टी जवळ घडला.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिरवली येथील राहणारे हरेश पवार हे आपल्या मुलगा मंगेश व सुन रुपाली यांचेसह खेड नारंगी नदीच्या बाजूला वीटभट्टी जवळ राहत होते.रुपालीने वीष घेऊन आत्महत्या केली तिचा पती मंगेश हा पत्नीचा मृतदेह घेऊन पुणे येथे अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेला होता.त्यावेळी पत्नीची चुलती भुरी वाघमारे हिने मंगेश याला सांगितले की रुपालीचे सासरे म्हणजे मंगेशचे वडील हरेश पवार हे रुपाली कडे वारंवार शरीर सुखाची मागणी करायचे व त्यासाठी तिला त्रास देऊन टॉर्चर करायचे. ही गोष्ट रुपालीने आपल्याला फोनवरून वांरवांर सांगितली होती.शेवटी त्रासाला कंटाळून रूपाली हिने विषारी गोळ्या घेऊन आत्महत्या केली. दरम्यान हरेश पवार यांनी देखील खेड येथे विषारी गोळ्या घेऊन आत्महत्या केली याबाबत मयत हरेश यांचा मुलगा मंगेश याने आपल्या वडिल हरेश पवार यांचे विरुद्ध रुपाली हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com