खोटा धनादेश दिला, बिल्डरला ५ लाखाचा दंड
रत्नागिरी ः खेड येथील अशोक रामचंद्र शिवगण यांना खोटा धनादेश देऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर खलिल करेल याच्याविरूद्ध दापोली न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने बिल्डर खलिल करेल याला ५ लाख ३५ हजार रुपयांचा दंड व तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.