
येरे येरे पावसा , मनसेचा शंकराला अभिषेक
जून महिना संपत आला तरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही जिल्ह्यात पाऊस यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खेडमध्ये शंकराला अभिषेक घालून गाभारा पाण्याने भरण्यात आला पावसासाठी साकडे घालण्यात आले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




