कुंभार्ली घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी ः पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणार्‍या कुंभार्ली घाटात १५० फूट खोल दरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या भागात गुरे घेवून गेलेल्या गुराख्याला हा मृतदेह आढळून आला. मृतदेह पुर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. याबाबत पोलिसांना खबर दिल्यावर हा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने वर काढण्यात आला. मात्र सदरच्या इसमाची ओळख सध्या काही पटलेली नाही. तसेच हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याबाबत कळू शकले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button