
उपवासाचे पदार्थ चांगल्या दर्जाचे मिळावेत म्हणून अन्न व औषध प्रशासन सतर्क
गणेशोत्सवानंतर आता भक्तांना नवरात्रीची वेध लागले असून येत्या 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त भक्त उपवास ठेवत असतात. नऊ दिवसात वरी तांदुळ, शाबुदाणा तसेच इतर पदार्थांची मोठी विक्री होत असते.
या कालावधीत निकृष्ट दर्जाचा वरी तांदूळ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट दर्जाची वरी तांदूळ शरीरासाठी घातक ठरू शकते. उपवासाचे पदार्थ चांगल्या दर्जाचे मिळावेत म्हणून अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. अन्नाचे नमुने घेण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे.




