रत्नागिरी-रायगडमधील पर्यटकांना आकर्षित करणार्या साहसी क्रिडा प्रकारांना परवानगी नाही ः पर्यटन राज्यमंत्र्यांची माहिती
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनार्यांवर साहसी क्रिडा प्रकार सुरू असून त्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच यामुळे स्थानिकांनाही मोठा रोजगार निर्माण झाला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मुरूड येथे पॅरासिलिंग करताना दोर तुटून १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकारात दोषी असणार्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला असता रत्नागिरी -रायगड समुद्रकिनार्यावर सुरू असलेल्या साहसी क्र्रीडा प्रकारांना परवानगी नसल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावात यांनी सांगितले. मंत्रीमहोदयांच्या या उत्तरामुळे रत्नागिरी-रायगड समुद्रकिनारी सुरू असलेल्या साहसी क्रीडा प्रकारांवर आता बंदी येणार की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.